सायनाची ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धेतून माघार

saina
नवी दिल्ली : आगामी कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतून भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने माघार घेतली असून पायाच्या दुखातीमूळे हा निर्णय घेतल्याचे सायना हिने सांगितले.

सायना हिच्या पायाला ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज स्पर्धेत गंभीर दुखापत झाली होती. मात्र, त्यानंतरही तिने हा किताब पटकावला होता. ती अद्याप या दुखापतीतून पुर्णपणे बरी झालेली नसल्यामुळेच कॉमनवेल्थ स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सायना हिने जाहिर केले आहे.