शेवटचा प्रश्न सुरुवातीला नको: राणे

rane
मुंबई: सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर आपण ठाम आहोत. या ‘ना’राजीनाम्याच्या प्रकरणाचा शेवट काय; हा प्रश्न सुरुवातीलाच विचारू नका; असेही राणे कोकण दौ-यावर रवाना होताना राणे यांनी ऐकविले.

आपण सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस फारसा प्रभाव पाडू शकणार नाही; असे पक्षश्रेष्ठींना ऐकवत राणे यांनी चव्हाण यांना नुकतेच आव्हान दिले होते. शिवसेना, भारतीय जनता पक्ष युतीच्या कार्यकालात मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेले राणे यांना अजूनही मुख्यमंत्री पदाची आस आहे. शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल होताना आपल्याला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन देण्यात आल्याचा राणे यांचा दावा आहे. मात्र आतापर्यंत अनेकदा राजीनाम्याचे दबावतंत्र वापरूनही कॉंग्रेस नेतृत्वाने राणे यांची डाळ शिजू दिली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री उशीरा राणे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यानीही राणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. आपण श्रेष्ठींच्या शब्दाबाहेर नाही. आपण कॉंग्रेसमध्येच आहोत. मात्र मंत्रीपद सोडण्याचा आपला निर्धार कायम आहे; असे राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपण आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून सोमवारीच आपण आपली आगामी भूमिका स्पष्ट करू. त्यामुळे याचा शेवट काय; हे तुम्ही सुरुवातीलाच विचारू नका; असे राणे म्हणाले.

Leave a Comment