मेट्रोच्या प्रस्तावित भाडेवाढीपासून मुंबईकरांची सुटका

mumbai-metro
मुंबई – मुंबईकरांना तूर्तास मुंबई मेट्रोच्या प्रस्तावित भाडेवाढीपासून दिलासा मिळाला आहे. मात्र उद्यापासून मेट्रोचे नवे दर लागू होणार आहेत. याबाबतचा आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून उद्यापासून मेट्रोचा तिकीटदर 10 रुपये, 15 रुपये आणि 20 रुपये असा असेल. मेट्रोचे हे नवे दर येत्या 30 जुलैपर्यंत राहातील.

यादरम्यान मेट्रोच्या दर निश्चितीसाठी समिती नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

उद्यापासून 0 ते तीन किलोमीटरसाठी 10 रुपये, तीन ते आठ किलोमीटरसाठी 15 रुपये आणि 8 ते 20 किलोमीटरसाठी 20 रुपये, असा तिकीटदर असेल. दरम्यान, याबाबतची पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहेत.

मेट्रोचे प्रस्तावित दर 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये आणि 40 रुपये अशी होती. मात्र तूर्तास हा तिकीटदर लागू होणार नाही.

Leave a Comment