ऑस्ट्रेलियन सुपर सिरीजचे सायनाला जेतेपद

sania
सिडनी – स्पेनच्या कॅरोलायना मरियानचा पराभव करत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेच्या महिला एकेरीतील जेतेपद पटकावले आहे.

सायनाने मरियानला २१-१८, २१-११ या सेटमध्ये पराभूत करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या सोबतच या सीझनमधील सायनाने मिळवलेले हे दुसरे जेतेपद आहे. वर्षाच्या सुरुवातीला इंडियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

Leave a Comment