केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे नवे मोबाइल अॅप्लिकेशन

incrdible-india
नवी दिल्ली- केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटन अधिक सोपे आणि सहज करता यावे यासाठी नवे मोबाइल अॅप्लिकेशन सुरु केले आहे. या अॅप्लिकेशन देशातील १६ शहरांचा समावेश केला आहे.

देशातील १६ शहरातील पर्यटनाची संपूर्ण माहिती या अॅप्लिकेशनमध्ये पर्यटकांना देण्यात आली आहे. ‘इनक्रेडिबल इंडिया वॉकिंग टूर्स’ असे या अॅप्लिकेशनचे नाव आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा सध्या समावेश केला आहे. त्याशिवाय आग्रा, अमृतसर, अहमदाबाद, बंगळूरू, भोपाळ, चंडीगड, चेन्नई, दिल्ली, गोव्यातील समुद्रभाग, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, पटना आणि सुरत या शहरांचा समावेश आहे. डिसेंबर २०१५पर्यंत या अॅप्लिकेशनमधील शहरांची संख्या ३६वर नेण्यात येणार आहे.

पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी या अॅप्लिकेशनमध्ये दहा शहरांचे स्ट्रीट व्यू आणि माहिती देण्यात आल्याचे सांगितले.
हे अॅप्लिकेशन सध्या केवळ ब्लॅकबेरी मोबाइलसाठी उपबल्ध आहे. लवकरच ते अँड्रॉइड ओएस फोनवर उपलब्ध होणार असल्याचे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

Leave a Comment