ऑस्ट्रेलिया सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीत सायना

saina
सिडनी – भारताची स्टार बॅडमिंटनपटून सायना नेहवालने आज ऑस्ट्रेलिया सुपर सिरीज स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यफेरीत धडक मारली.

सायनाने सहाव्या सीडेड जपानच्या इरिको हिरोसेला २१-१८ २१-९ असे सरळ गेममध्ये ४७ मिनिटात पराभूत केले. सायनाने जरी या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली असली तरी पी.व्ही. सिंधूला मात्र उपांत्यापूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले आहे.

आठव्या सीडेड सिंधूचा स्पेनच्या कार्लिना मरीनने १७-२१ १७-२१ या सेटमध्ये पराभव केला. उपांत्यफेरीत सायनाचा सामना जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेल्या चीनच्या वँग शिजियनसोबत होणार आहे.

‘उपांत्यपूर्व फेरीत हिरोसच्या विरोधातील लढत अतिशय कठीण होती. उपांत्यफेरीत माझा सामना वँग शिजियनसोबत होणार आहे. मला असेच प्रोत्साहन द्या’, असे सायनाने सांगितले.

Leave a Comment