यंदाचा ‘गोल्डन बूट’ कोण नेणार ?

golden-boot
ब्राझील – आज फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी सामन्यांची सांगता होत असून त्याच पार्श्वभूमीवर यंदाचा सर्वाधिक गोलसाठी दिला जाणारा गोल्डन बूट कोणाला मिळणार, याची उत्सुकता देखील ताणली गेली आहे. मेस्सी-नेमार यांच्या खात्यावर सध्या प्रत्येकी 4 गोल आहेत तर शकिरीने धक्कादायक हॅट्ट्रिक नोंदवत गोल्डन बूटच्या शर्यतीत गरुडझेप घेतली आहे.

सर्वाधिक गोल नोंदवणाऱया खेळाडूला गोल्डन बूटचा पुरस्कार सर्वसाधारणपणे दिला जातो. अर्थात, सर्वाधिक गोल नोंदवणारे खेळाडू एकापेक्षा अधिक असतील तर मात्र त्यातून आणखी गोल नोंदवण्यासाठी अधिक पासेस कोणी दिले, तो निकष अंमलात आणला जातो. गोल्डन बूट पुरस्कार विजेत्याची फिफाची तांत्रिक समिती निवड करते.१९३० मधील पहिल्या विश्वचषक स्पर्धेपासूनच गोल्डन बूट पुरस्कार दिला जात आहे. मध्यंतरी काही स्पर्धांमध्ये हा पुरस्कार विभागूनही दिला गेला.

फ्रान्सच्या जस्ट फोन्टेन याच्या नावावर सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आहे. स्वीडनमध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये त्याने सर्वाधिक १३ गोल नोंदवले आहेत.

यंदा सध्या किमान 9 खेळाडूंमध्ये या पुरस्कारासाठी रस्सीखेच असली तरी नंतर ती आणखी रंगतदार होऊ शकते. शकिरीने एकाच सामन्यात 3 गोल करत त्याची छोटीशी चुणूक दाखवून दिली आहे. यापूर्वी जर्मनीच्या म्युलेरने देखील हॅट्ट्रिक केली होती. नेमार व मेस्सी यांनी मात्र हॅट्ट्रिक न करताही प्रत्येकी 4 गोल नोंदवले आहेत.

Leave a Comment