
ठाणे – ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोडवरील एका खाजगी बंगल्यात सुरु असलेल्या अश्लील पार्टीवर धाड टाकली आहे. ठाणे गुन्हे शाखेने येथे धाड टाकत ही पार्टी उधळून लावली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य जप्त केले आहेत. त्याच बरोबर या बंगल्यातून १६ पुरुष तर १४ युवतींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांची अश्लील पार्टीवर धाड
या युवतींमध्ये तीन विदेशी तरुणींचा ही समावेश आहे. विना परवाना अश्लील वर्तन करून पार्टी करण्याच्या गुन्ह्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. तसेच या सर्वांची विचारणा केली असता पार्टीतील हे सर्वजण एकमेकांना ओळखत नसल्याचे समोर आले.
ही पार्टी कोणाची होती आणि हे सर्व कोण आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर बंगल्यात काही तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत सापडले आहेत.
