राष्ट्रवादीचा राडा ;’सामना’वर पोलिसांचा ‘खडा पहारा’

pawar
मुंबई – नरेंद्र मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दहशतवादी हाफिज सईदशी तुलना केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या कार्यालयावरच धडक मारली,त्यामुळे सेना आणि राष्ट्रवादीत राडाही झाला. खवळलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तेथे ठाण मांडून बसल्याने ‘सामना’वर पोलिसांनी ‘खडा पहारा ‘ ठेवला आहे.

शिवसेनेने ‘सामना’मधून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेने राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील प्रभादेवी इथे असलेल्या ‘सामना’ प्रेसवर मोर्चा काढला. सामना प्रेसबाहेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली .पुण्यातील फेसबुकप्रकरणानंतर शरद पवारांनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. त्यानंतर शरद पवार हे पाकिस्तानी अतिरेकी हाफिज सईदसारखी गरळ ओकत असल्याची विखारी टीका ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली. तसेच राज्यातील हत्येशी मोदींचा काय संबंध असा प्रश्नही ‘सामना’मध्ये विचारण्यात आला. मात्र पवारांची तुलना दहशतवादी सईदशी केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात संतापाची लाट आहे.

Leave a Comment