पंकजा लढविणार मुंडे यांची रिक्त झालेली जागा

munde
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची रिकामी झालेली बीड लोकसभेची जागा त्यांची आमदार कन्या पंकजा मुंडे पालवे लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पंकजा सध्या परळीच्या आमदार आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुक लढविली तर त्यांची रिकत जागा मुंडे यांची दुसरी कन्या यशश्री लढवेल असेही सांगितले जात आहे.

मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सहा महिन्यात पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ही जागा पंकजा हिने लढवावी याला भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी संमती दर्शविली आहे. भाजपची ही खात्रीची सीट आहे. पंकजा विजयी झाल्या तर त्यांना राज्यमंत्रीपद दिले जाईल असेही खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

महाराष्ट्र प्रदेश भाजपतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंकजा लोकसभेत गेल्या तर त्यांची विधानसभेची जागा मुंडे यांची मुंबईत शिक्षण घेत असलेली कन्या यशश्री लढवेल. यशश्रीला राजकारणात रस आहे. यशश्री आणि पंकजा यांच्या संबंधित जागा लढविण्याच्या निर्णयाला नितीन गडकरींसह अनेक वरीष्ठ भाजप नेत्यांनी संमती दर्शविली आहे मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय २२ जूननंतर घेतला जाणार आहे असेही समजते.
——–

Leave a Comment