मुंडेंच्या अपघाताबाबत ‘ते’ प्रश्न माझे नाहीत – पंकजा मुंडे-पालवे

pankaja
बीड – ‘पंकजा मुंडे-पालवे डॉट कॉम ‘ही माझी स्वतंत्र वेबसाइट असून त्यावर असणारे फेसबुक आणि व्हॉट्सअॅप अकाऊंट हेच माझे अधिकृत अकाऊंट आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना झालेल्या अपघाताबाबत मी कोणतेही प्रश्न अथवा शंका मी त्यावर पोस्ट केलेल्या नाहीत ,त्यामुळे फेसबुक आणि व्हॉटसअॅपवर उपस्थित झालेल्या शंकांवर जनतेने विश्वास ठेऊ नये. असे आवाहन मुंडे यांच्या कन्या आणि भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले आहे.त्यांनी म्हटले आहे कि ,अपघातासंबंधी व्हॉटसअॅपवर आणि फेसबुकवर शंका उपस्थित करणारे प्रश्न माझ्या नावाने फोटोसह प्रसारित झाले आहेत. मात्र अशा स्वरूपाचे संदेश मी पाठवलेले नाहीत . वास्तविक माझी स्वतंत्र वेबसाइट पंकजा मुंडे-पालवे डॉट कॉम असून त्यावर असणारे फेसबुक आणि व्हॉट्सअॅप अकाऊंट हेच माझे अधिकृत अकाऊंट आहे. अपघाताबाबत मी कोणतेही प्रश्न अथवा शंका मी त्यावर पोस्ट केल्या नाहीत. तसेच अपघातासंदर्भात मी काही शंकाही उपस्थित केलेल्या नाहीत.असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment