प्रॉव्हिडंट फंडावर यंदा ९ टक्के व्याज

pf
दिल्ली – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड यंदाच्या वर्षी आपल्या पाच कोटी ग्राहकांना ९ टक्के दराने व्याज देऊ शकेल असे समजते. गतवर्षी हा व्याजदर ८.७५ टक्के इतका होता.

केंद्रात नव्याने आलेले सरकार, बाजाराची सुधारलेली परिस्थिती आणि विविध गुंतवणुकीवर मिळत असलेले अधिक व्याज याचा आढावा घेऊन भविष्य निर्वाह निधी विभागाने २०१४-१५ सालासाठी ९ टकके व्याज देणे शक्य होणार असल्याचे सूचित केले आहे. २०१३-१४ या वर्षात या निधीत तब्बल ७१,१९५ कोटी रूपये जमा झाले आहेत. आणि नवीन सुधारणांनुसार विभागाला तयतील ५५ टक्कयांपर्यंतची रक्कम बँका, वित्तीय संस्था तसेच गुंतवणुक संस्थांमध्ये गुंतविण्यास परवागनी देण्यात आल्याने विभागाचे व्याजस्वरूपातील उत्पन्नही वाढणार आहे.याचा थेट फायदा आपल्या ५ कोटी ग्राहकांना करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

Leave a Comment