मेट्रोला उद्याचा मुहूर्त

metro
मुंबई – मोनो रेल्वेनंतर मुंबईचे दुसरे आकर्षण ठरणारी मेट्रो रेल्वे उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे अशी घोषणा मेट्रो रेल्वेचे सीईओ अभय मिश्रा यांनी शनिवारी सकाळी केली. पहिल्या टप्प्यामध्ये मेट्रो रेल्वे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणार असली तरी तिकीट दरावरून राज्यशासन आणि रिलायन्स यांच्यात बिनसले आहे. राज्यशासनाने ठरविलेल्या दरपत्रकाला केराची टोपली दाखवून रिलायन्सने त्यांचे दरपत्रक लागू केले आहे. मात्र त्याबाबत माहिती देणे अधिकाऱ्यांनी टाळले आहे .

वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रो रेल्वेच्या मार्गावर एकूण बारा स्थानके असून, मेट्रोचा संपूर्ण प्रवास वातानुकूलित असेल. मुंबई मेट्रोला केंद्रीय रेल्वे बोर्डाने गुरुवारी सुरक्षेशी संबंधित सर्व प्रमाणपत्र दिल्यानंतर मेट्रो रेल्वेच्या उदघाटनावरुन राजकरणही रंगले. मुंबईतल्या भाजप खासदारांनी शनिवारी दुपारी मेट्रो रेल्वेच्या उदघाटनचा घाट घातला होता. मेट्रोच्या तिकीट दरावरुन रिलायन्स आणि राज्य सरकारमध्ये एकमत होत नसल्याने मेट्रोचे उदघाटन रखडले आहे. मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यावर एकूण २३५६ कोटी रुपये खर्च झाला असून, पश्चिम आणि पूर्व उपनगराला जोडणारा मेट्रो रेल्वे प्रमुख दुवा ठरेल.

मेट्रोची वैशिष्ट्ये
मुंबईत पहाटे ५.३० ते रात्री १२ या वेळेत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे.

दररोज १६ मेट्रो ट्रेन घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणार असल्याने रस्ते वाहतुकीवरील बरचसा ताण हलका होणार आहे.

प्रत्येक मेट्रोचे वैशिष्ट्यः वातानुकुलित चार कोच असणाऱ्या मेट्रोची प्रवाशी क्षमता १५०० आहे.

Leave a Comment