
बीड – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बदललेल्या कार्यक्रमामुळे नियोजित ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी जाण्यास नकार देणा-या हेलिकॉप्टर चालकास त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार येथे घडला. हे प्रकरण लाऊन धरण्याचा निर्णय हेलिकॉप्टर व्यावसायिकांची संघटना असलेल्या रोटरी विंग सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आला आहे.
