शुभ्र दंतपंक्तीपासून सावध

माणसाच्या रुपामध्ये त्याच्या दातांना ङ्गार महत्व असते. कोणाचे दात कुंदकळ्यासारखे असतात तर कोणाच्या दाताची ठेवण मोतीचुरा सारखी असते. रचनेबरोबरच दातांचा रंग सुद्धा महत्वाचा असतो. शुभ्र दंतपंक्ती म्हणजे पांढरे शुभ्र दात हे खरोखरच सौंदर्याचे लक्षण आहे. जगाच्या कोणत्याही भागात गेलो तरी दाताच्या या सौंदर्याबाबत सर्वांचे एकमत झालेले दिसते. वास्तविक पाहता दातांचा रंग हा पांढरा नसतो. निसर्गत: तो साधारण पिवळसर असतो. म्हणजे दात ङ्गार पिवळे असू नयेत. ते पित्तप्रकृतीचे लक्षण असते. मात्र ते किंचित पिवळसर असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. हे लक्षण सौंदर्याशास्त्राला मात्र मान्य नाही. सौंदर्यशास्त्र पांढर्‍या शुभ्र आणि मोत्यासारख्या दातांना महत्व देते आणि म्हणून आता ब्युटी पार्लर सोबतच काही व्यावसायिकांनी दात पांढरे शुभ्र करून देणारे क्लिनिक सुरू केले आहे. अजूनही भारतामध्ये त्याची लाट आलेली नाही, ती अमेरिकेत आहे. भारतात ती कधी येईल सांगता येत नाही आणि आली तरी ती ङ्गार वेगाने येईल. 

अमेरिकेत काही सुपर मार्केट आणि मॉलमध्ये अशा व्यावसायिकांनी आपली छोटीशी दुकाने थाटली असून तिथे व्यवसाय सुरू केला आहे. मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी आलेली एखादी गृहिणी त्यातल्या त्यात पाच मिनिटांचा वेळ काढून अशा सेंटरमध्ये जाते आणि दात पांढरे शुभ्र करून बाहेर पडते. त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडते. परंतु अमेरिकेतल्या दंतवैद्यांनी आता या उपचाराच्या बाबतीत सावधान तेचा इशारा द्यायला सुरुवात केली आहे. दात पांढरे करणारे हे अर्धवट डॉक्टर त्यासाठी कार्बामाईड टेरॉक्साईड नावाचे द्रव्य वापरतात. हे द्रव्य घरी वापरून सुद्धा आपण आपले दात पांढरे शुभ्र करू शकतो. परंतु दात झटपट पांढरे करण्यासाठी १५ ते ३५ टक्के तीव्रतेचे हायड्रोजन पेरॉक्साईड वापरले जाते. 

त्यासोबत काही एक प्रकारची ब्लिचिंग पावडर वापरली जाते. त्याशिवाय काही व्यावसायिक दातावरून हलकासा लेझर किरण सुद्धा पास करतात. या प्रकारांनी दात झटपट पांढरे होत असले तरी त्यापासून काही धोके सुद्धा संभवतात. या लोकांना मुळात एवढी औषधे वापरण्याची परवानगी आहे का? हा मुद्दा महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मिश्रणामध्ये काही कमी-जास्त झाले तर दातावरचे एनॅमल कायमचे निघून जाण्याचा धोका असतो. ते निघून गेले की, दाताची मजबुती तर कमी होतेच पण दाताची चमक सुद्धा जाते. दात पांढरे असले पाहिजेत ही गोष्ट खरी आहे परंतु चमक घालवून पांढरेपणा आणण्यात काही अर्थ नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दातांवरचा हा उपचार करताना हिरड्यांना कसलाही त्रास होता कामा नये. तसा त्रास होण्याची काही प्रकरणे दिसलेली आहेत. हिरड्यांची जळजळ होणे किंवा हिरड्या दुखायला लागणे असे त्रास दिसूनही आलेले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment