मोदी कधीही पंतप्रधान होऊ शकत नाहीत- शरद पवार

सातारा- देशातील सर्व जातिधर्माच्या नागरिकांना पंतप्रधान होणा-याने विश्वास द्यावा लागतो, अशा विश्वासालाच ज्याने तडा दिला आहे ते मोदी कधीही पंतप्रधान होऊ शकत नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त करीत मोदी यांच्याय एककल्ली कार्यक्रमावर टीका केली आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. या वेळी आमदार बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, मकरंद पाटील, शिवेद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप येळगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, बाळासाहेब भिलारे, बकाजीराव पाटील, सुधीर धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, गेल्याच काही दिवसांपासून मोदीकडून प्रचार सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत देशातील सर्व जातिधर्माच्या नागरिकांना कसलाच दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे पंतप्रधान होणा-याने थोडाफार विश्वास द्यावा लागतो. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी विश्वासालाच तडा दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणीच विश्वावस दाखविणार नाही.