मायकल शूमाकर येतोय हळूहळू शुद्धीत

पॅरिस: गेल्या चार महिन्यांपासून कोमात असलेला फॉर्म्युला वनचा बादशाह मायकल शूमाकर हळूहळू शुद्धीत येत आहे. शूमाकरच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असल्याची माहिती त्याची व्यवस्थापक सबिन केमने दिली आहे. मात्र आता शूमी हळूहळू शुद्धीत येत असल्याची माहिती मिळाल्यािने शूमाकरच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्याची प्रकृती सुधारण्यासाठी ते प्रार्थनाही करत आहेत.

डिंसेबर महिन्यात शुमाकरचा अपघात झाला होता. याआधी शुमाकर उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वृत्त होते. आता तो शुद्धीत येत असल्याच्या माहितीने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तीन महिने कोमात राहिल्याने मायकल पूर्णपणे बरा होण्याची शक्यता फार कमी आहे. त्याकमुळे शुद्धीवर आल्याानंतर त्या ची तब़्लयेत आता चांगलीच सुधारली आहे.
शूमाकरला गेल्या वर्षी २९ डिसेंबरला आल्प्स पर्वतरांगेत स्कीईंग करताना अपघात झाला होता. त्यानंतर तीन महिन्यांपासून तो कोमातच आहे. त्याच्यावर ग्रेनोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यादरम्यान, त्याच्यावर दोन शस्त्रक्रियादेखील झाल्या.

Leave a Comment