
मुंबई: दोनदा मतदान करण्याचे बेकायदेशीर कृत्य करण्याचा सल्ला माथाडी मेळाव्यात देणा-या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर कारवाई करून त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मान्यता रद्द करावी; अशी मागणी आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगानेही पवार यांच्या धक्कादायक विधानाची दाखल घेऊन त्यांच्या भाषणाची सीडी मागवून घेतली आहे.
