आधी शिवसेना चालवून दाखवा- अजित पवार

ठाणे : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूक व त्यांनतर होत असलेल्या राज्यातील लोकसभा निवडणूक जिंकून सरकार चालविण्याचा विचार नंतर करा, त्याआधी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तोडफोड थांबवून शिवसेना धड चालवून दाखवा, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील सेंट्रल मैदानावरील जाहीर सभेत केली.

यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘गेल्या २३ वर्षांत शिवसनेनेतून छगन भुजबळ गेले, गणेश नाईक गेले, नारायण राणे गेले, भास्कर जाधव गेले त्यांनतर घरातले सुद्धा गेले. शिवसेनाप्रमुखांचे उजवे हात समजल्या जाणा-या मनोहर जोशींना कोणती वागणूक दिली? याचा विचार करा. भुजबळ आमच्यात आलेत त्यांचा काय, गणेश नाईकांचा काय, नारायण राणेंचा काय, भास्कर जाधवांचा काय आणि अगदी आनंद परांजपेंचा काय, आम्ही धक्काक लागू दिला नाही. बिचार्या त्या वाघचौरेंवर शिर्डीत काय हल्ला करता? काय असेल ते इथे करून दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले.’

बाळासाहेबांची जी शिकवण होती, तीदेखील आज ते विसरले आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांचे आठ ते दहा आमदार काँग्रेसकडे गेले होते. त्यांनी आम्हाला मंत्रीपद द्या, आम्ही पक्ष सोडतो, अशी विनवणी केली. आणि आता त्यांच्याच मुलांना शिवसेनेने खासदारकीची उमेदवारी दिल्याची टीका आमदार एकनाथ शिंदे यांचे नाव घेता त्यांनी केली. त्यामुळे शिवसेनेत सध्या काय चालले आहे, हे आता शिवसैनिकांनी ओळखले पाहिजे असे पवार यांनी सांगितले.

Leave a Comment