
बीड – केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे काल दुपारी इमर्जन्सी लँडींग करावे लागले असल्याचे वृत्त आहे. पलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवार उस्मानाबाद येथून हेलिकॉप्टरने एका सभेसाठी परभणीकडे निघाले होते. मात्र वाटेत हवा अचानक खराब झाल्याने त्यांचे हेलिकॉप्टर बीड जिल्ह्यातील अंबोजोगाई च्या एसआरटी मेडिकल कॉलेजच्या मैदानावर उतरविण्यात आले.
