निवडणुकीत उध्दव ठाकरेनी उभारून दाखवावे- पवार

पिंपरी – निवडणुकीत उभे राहण्याचा सल्ला आमचे साहेब शरद पवार यांना न देता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वता निवडणूकीला उभे रा‍हून दाखवावे, असे उघड आव्हाीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी येथील कार्यक्रमप्रसंगी दिले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर कडवट शबदात टीका केली.

यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हलणाले, मनोहर जोशी यांनी सदैव बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिली आणि त्यांचीच नाचक्की केली. तर दुसरीकडे खासदार असलेले चंद्रकांत खैरे यांनी आदित्य ठाकरेंना वाकून नमस्कार केल्याचा दाखला देऊन शिवसेनेत गेल्यास काही दिवसांपासून लाचारी वाढली असल्याचे स्प्ष्ट केले.

पिंपरी येथे आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी भाजप, शिवसेना व मनसेवर टीका केली. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांची जीभ पुन्हा सैल सुटली असल्याचे दिसून आले.

Leave a Comment