आयपीएलमध्ये पीटरसन, युवराज, सेहवागचा भाव वधारणार

मुंबई- बेंगळुरू येथे १२, १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या सातव्या मोसमाचा लिलाव होणा आहे. या लिलावावेळी अलीकडेच निवृत्त झालेल्या इंग्लंडच्या केविन पीटरसन सोबतच टीम इंडियाचा ओपनर वीरेंदर सेहवाग, युवराज सिंग यांचा भाव चांगलाच वघारणार आहे. त्यामुळे या सर्व कसोटीपटूंची नावे लिलावात सुरूवातीलाच पुकारली जाण्याची शक्यता आहे.

यावेळी होत असलेल्या लिलावात पीटरसन, वीरेंदर सेहवाग व युवराज सिंगसोबतच सर्वाधिक चर्चा न्यूझीलंडचा विश्वविक्रमी फलंदाज कोरे अँडरसनच्या नावाची राहिल. अलीकडेच त्याने विंडीजविरुद्ध विक्रमी शतक झळकावल्यामुळे त्याचा समावेश अष्टपैलू करण्यात आला असून तो ८३ व्या क्रमांकावर आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने ६५१ मधून ५१४ खेळाडूंची निवड केली असून यापैकी २१९ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे यात १६९ खेळाडू भारताचे असून इतर ५० परदेशी खेळाडू आहेत.

यामधील काही अव्वल खेळाडूंचा मर्की गटात समावेश असून यात पीटरसन, युवराज, सेहवाग, डेव्हिड वॉर्नर, महेला जयवर्धन, मिचेल जॉन्सन, जॅक कॅलिस यांच्यासह भारतीय कसोटीपटू मुरली विजयचाही समावेश आहे. या सा-यांची आधारभूत किमत (बेस प्राईस) २ कोटी रूपये आहे. मर्की २ गटात न्यूझीलंड कर्णधार ब्रेंडन मॅकलम, जॉर्ज बेली, झहीर खान, प्लासिस, मायकेल हसी, डॅरन सॅमी यांचा समावेश असून यांची किमत दीड कोटी आहे. दक्षिण् आफ्रिकेचा युवा यष्टिरक्षक फलंदाज कीटन डी कॉक त्याची आधारभूत एक कोटी ठरवण्यात आली असल्यारचे समजते. खास फलंदाजीत एरॉन फिंच, ब्रॅड हॉज, मॉर्गन, स्मिथ, रॉस टेलर, तर गोलंदाजीत मिचेल स्टार्क, भुवनेश्वरकुमार, प्रवीण कुमार, उमेश यादव, विनयकुमार यांचा समावेश आहे.

Leave a Comment