मुंडेना फोन करणार्‍या महिलेला जीवे मारण्याची धमकी

पुणे – भाजपचे वरीष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना वारंवार फोन करून त्यांची भेट मागणार्‍या पुण्यातील महिलेला मुंडे यांचे चालक व रक्षक यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या महिलेला शिवीगाळ करून प्रेत ओळखू येणार नाही अशा पद्धतीने ठार केले जाईल अशी धमकी या दोघांना दिली असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल केली गेली होती. त्यावर पोलिसांनी या दोघांना ११ डिसेंबरला अटकही केली होती मात्र १२ डिसेंबरला मुंडे यांच्या वाढदिवशी त्या दोघांचीही जामीनावर मुक्तता करण्यात आली असल्याचे समजते.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय अनिता बोरा या महिलेने मुंडे यांना फोन करून भेटण्याची मागणी केली होती. बोरा यांच्या म्हणण्यानुसार त्या मुंडे यांना गेली पाच वर्षे ओळखतात. त्या मुंडे यांना वारंवार फोन व मेसेज करत होत्या मात्र मुंडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तसेच एकदा पुन्हा फोन करू नका असेही बजावले. बोरा डिसेंबर ११ ला मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईत आल्या व ब्रांद्यातील हॉटेलमध्ये उतरल्या होत्या. येथे आल्यानंतर त्यांनी पुन्हा मुंडे यांना फोन केला तेव्हा त्यांचा ड्रायव्हर संजीव वळजी आणि रक्षक शाहू गुरव यांनी हॉटेलवर जाऊन त्यांना शिवीगाळ केली, मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बोरा यानी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Leave a Comment