रत्नागिरीत आढळला दुर्मिळ जातीचा काळा बिबट्या

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात तोरणा भाटी परिसरात अतिशय दुर्मिळ जातीचा काळा बिबट्या आढळला. हा बिबट्या एका विहिरीत पडलेला आढळल्याने एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांना सकाळपासून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या, मात्र विहिरीत पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण हा बिबट्या कोकणात आढळणाऱ्या नेहमीच्या बिबट्यापेक्षा वेगळा होता.

यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. अवघ्या पाऊण तासात वनविभागाने तत्परतेने कारवाई करत विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढलं. अशाप्रकारचा बिबट्या आढळल्याचं अनेकदा गावकऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात पुरावा मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा बिबट्या दोन वर्षांचा आहे. यानंतर जिल्हधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या दुर्मिळ बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात लवकरच सोडण्यात येणार आहे.

Leave a Comment