भोपाळ – सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर आज भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वातही नसते, असे प्रत्युत्तर कॉँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी दिले. येथील राजा भोज विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.

जातीय हिंसाचाराला खतपाणी घातल्याबद्दल सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी आणली असती असे सिंह म्हणाले. सरदार पटेल हे देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर देशाचे चित्र वेगळे असले असते, असे भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले होते. सरदार पटेल स्मृती कार्यक्रमात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत मोदी यांनी नेहरूंवर टीका केली होती.