
नवी दिल्ली- नवी दिल्लीमध्ये तिसर्या आघाडीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. नवी दिल्लीत आज एकाच मंचावर समाजवादी पक्ष, जेडीयू, सीपीआयएम, जेडीएस, सीपीआय यांसह 20 पक्ष उपस्थित आहेत. जेडीयूचे शरद यादव, सीपीएमचे प्रकाश करात, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव एकत्र दिसून आले. धर्मांध शक्तींपासून देशाचा बचाव हेच आजच्या बैठकीचं उद्दिष्ट्य आहे, असं वक्तव्य सीताराम येचुरींनी केलंय. तर देशात सध्या देश तो़डण्याचं कारस्थान रचलं जातंय. त्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज नितीश कुमारांनी व्यक्त केलीय.
