नवी दिल्ली – केंद्र सरकारनं सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज केंद्रीय कर्मचार्यांसाठी ही घोषणा केली. या वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचार्यांच्या सध्याच्या वेतनापेक्षा जास्त वेतन मिळेल.
केंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगाची घोषणा
केंद्र सरकारने ही घोषणा आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन केली असल्याचे बोलले जाते आहे. याचा फायदा 80 लाख केंद्रीय कर्मचार्यांना होईल. सरकारने आज सातव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली. हा वेतन आयोग 2 वर्षात आपल्या शिफारशी लागू करतील.
कामगार संघटनांची मागणी लक्षात घेऊन यावेळी सरकारने वेळेआधीच सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. सरकारनं सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2006 पासून लागू झाल्या होत्या. तर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहेत.
