नैरोबी – नैरोबीतील एका मॉलमध्ये झालेल्या हल्ल्यामधील हल्लेखोर हे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये काहीकाळ वास्तव्यास असल्याचे, केनियांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. नैरोबीतील वेस्टगेट मॉलमध्ये घुसून अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 63 नागरिक ठार झाले आहेत.
नैरोबीतील हल्लेखोर अमेरिका, ब्रिटनमध्ये
त्यानी काही नागरिकांनी ओलिस ठेवले होते. अखेर आज (मंगळवार) चौथ्या दिवशी हे नाट्य संपुष्टात आले असून, सर्व ओलिस नागरिकांनी सोडविण्यात आले आहे. तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. काही दहशतवादी जखमी असल्याचेही सांगण्यात येत आहे. केनियाचे परराष्ट्रमंत्री अमिना मोहम्मद म्हणाले, सोमाली किंवा अरब वंशाचे अमेरिकेत राहिलेले 18 ते 19 वर्षांचे हल्लेखोर या कृत्यामागे आहेत. ते अमेरिकेतील मिनेओस्टा शहरासह काही ठिकाणी वास्तव्यास होते.
या हल्ल्यात सहभागी असलेली महिला बराच काळ ब्रिटनमध्ये वास्तव्यास होती. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्त्या जेन पास्की म्हणाल्या, की या हल्ल्यामागे अमेरिकन नागरिकाचा समावेश आहे, की याचा शोध घेण्यात येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत पुरावे हाती लागले नाहीत.
नैरोबीमधील वेस्टगेट मॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी केनिया पोलिसांनी एका ब्रिटीश नागरिकाला अटक केली आहे. केनियन पोलिसांनी नैरोबीतील विमानतळावरुन या नागरिकाला अटक केली. पंचवीस ते तीसच्या वयोगटातील हा तरुण असून, त्याला संशयावरुन अटक करण्यात आली आहे. तो नैरोबीवरुन टर्कीला चालला असताना त्याला अटक करण्यात आली.
डेली मेल या ब्रिटीश वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या तरुणाच्या चेह-यावर जखमा होत्या तसेच त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला अटक करण्यात आली. केनियन पोलिसांनी अटक केलेल्या ब्रिटीश नागरिकाला ब्रिटन सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नागरिक कोण आहे, काय करतो याविषयी ब्रिटीश अधिका-यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. वेस्टगेट मॉलवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांमध्ये एका ब्रिटीश तरुणीसह काही अमेरिकन्स असल्याचे केनियन अधिका-यांनी सांगितले.
