सिंचन श्वेतपत्रिकेची होळी करा: गोपीनाथ मुंडे

नागपूर: सिंचन प्रकल्पातील घोटाळ्याचा उल्लेखही नसलेल्या सिंचन श्वेत पत्रिकेची चौका चौकात होळी करा; असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी आणि सिंचन घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी, शेतीमालाला योग्य भाव, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दारात वर्षाला १२ सिलेंडर या प्रमुख मागण्यांसाठी भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगन्तीवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि खासदार मुंडे आवर्जून उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुंडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कठोर टीका केली. काँग्रेस प्रणीत ही दोन्ही सरकारे म्हणजे भ्रष्टाचाराच्या बस्मासुराची पिल्लावळ आहे; अशी टीका मुंडे यांनी केली. अनेक प्रकल्पांच्या किंमती वाढवून या सरकारांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे; असा आरोपही त्यांनी केला.

ऐन अधिवेशन काळात काढलेल्या या मोर्चासाठी राज्यभरातील पक्ष कार्यकर्ते नागपूर येथे दाखल झाले.

Leave a Comment