गृहमंत्र्यांची जीभ पुन्हा घसरली

नवी दिल्ली: यापूर्वी दोन वेळा कटू अनुभव येउनही केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जीभ बोलण्याच्या ओघात पुन्हा घसरली. गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी मुस्लीम व्यक्तीची प्रथमच नेमणूक करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या एकमेव व्यक्ती आहेत; असे विधान शिंदे यांनी बडोदा येथे प्रचारसभेत बोलताना केली.

महत्वाची गुप्तचर संस्था असणाऱ्या आयबी या संस्थेच्या प्रमुखपदाची सूत्रे सन १९७७च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी एस. ए. इब्राहीम लवकरंच हाती घेणार आहेत. या नियुक्तीचे श्रेय सोनिया गांधींना गृहमंत्र्यांनी देऊन टाकले. मी दलित असूनही मलाही त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद आणि देशाचे गृहमंत्रीपद दिले हे सांगायला ते विसरले नाहीत. मात्र आपल्याला मिळालेली पडे ही राजकीय आहेत; तर गुप्तचर विभागाचे प्रमुख पद हे संवेदनशील आणि प्रशासकीय आहे; हे मात्र गृहमंत्री विसरले.

यापूर्वी पुण्यात; ‘लोक बोफोर्स प्रकरण जसे विसरले; तसे कोळसा कांडही विसरतील; असे विधान करून शिंदे अडचणीत आले होते. त्याच प्रमाणे कसबाला फाशी कधी देणार याबद्दल सोनिया गांधी आणि खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग अनभिज्ञ होते; असे आणखी एक विधान करून त्यांनी त्या दोघांचाही रोष ओढवून घेतला होता.

Leave a Comment