
न्यूयॉर्क दि.५ – भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी ओक क्रीक गुरूद्वाराला भेट देऊन तेथे ऑगस्टमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्याचवेळी गुरूद्वाराचे प्रमुख पंजाब सिंग यांच्या कुटुंबियांचीही त्यांनी मिलवॉकी येथील रूग्णालयात भेट घेतली. या रूग्णालयात गोळीबारात जखमी झालेले व कोमात असलेले पंजाबसिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मायकेल वेड नावाच्या इसमाने येथे केलेल्या बेछूट गोळीबारात ६ शीख ठार झाले तर अनेक जखमी झाले होते.
