अखेर ट्विटर पंतप्रधानांची बनावट अकाऊण्ट्स बंद करणार

नवी दिल्ली: अखेर भारताने दिलेल्या तंबीनंतर ट्विटरने पंतप्रधानांची बनावट अकाऊण्ट्स बंद करण्यास संमती दिली आहे.

कोणतेही अकौंट बंद करून त्याबाबत कारवाई करण्यापूर्वी आम्हाला ठरलेल्या प्रक्रियेतून जावे लागत असल्याचा खुलासा वेबसाईट व्यवस्थापनाने केला असून लवकरंच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाने उघडलेली सहा बनावट अकाऊण्ट्स बंद करण्यात येतील; असे पंतप्रधानांचे संपर्क सल्लागार पंकज पचौरी यांनी सांगितले.

जनतेशी पंतप्रधानांना थेट संपर्क साधने शक्य व्हावे यासाठी ट्विटरवर अकौंट उघडणे ही पचौरी यांचीच कल्पना होती. मात्र त्याचा फायदा घेऊन बनावट अकाऊण्ट्स उघन्यामागे देशाभारील शक्तींचा हात असू शकतो; अशी शक्यता पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी वर्तविली.