गुरुद्वारा हल्ल्यातील हल्लेखोराची आत्महत्या

अमेरिकेतील ओक क्रिक विस्कॉन्सिन गुरुद्वारात गोळीबार करून सहा जणांचा जीव घेणाऱ्या वेड पेज याने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली असल्याचे एफ बी आय ने गुरुवारी जाहीर केले आहे. पेज पोलिसांच्या गोळीमुळे मेला असल्याची शक्यता यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती त्यावर हा खुलासा करण्यात आला आहे.

पेज सुपरमेसिस्त संघटनेशी संबंधित होता आणि अनेक खासगी संस्थांच्या रडारवर होता तरीही त्याला मॉनीटर केले जात नव्हते याचे एफ बी आयने समर्थन केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी पंतप्रधान मनमोहनसिंग याच्याशी फोनवर बोलून दुःख व्यक्त करताना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.

Leave a Comment