नवी दिल्ली: टीम अण्णाच्या जंतर मंतरवरील उपोषणाला पाठींबा देण्यासाठी अण्णा समर्थकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. जोपर्यंत उपोषण सुरू राहील तोपर्यंत पंतप्रधांच्या निवासस्थानासमोर निदर्शने सुरू राहतील; असा इशारा टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य अरविंद केजरीवाल यांनी दिला.
आंदोलनाच्या सुरुवातीपासून जनसामान्यांच्या सहभागाची वाट बघणार्या आंदोलकांना शनिवारी संध्याकाळी दिलासा मिळाला. जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय पाठिंबा देण्यासाठी जमला. या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी समर्थकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. निदर्शकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. राजकीय नेत्यांच्या प्रतिमा त्यांनी पायदळी तुडविल्या. निदर्शकात महिलांची संख्या उल्लेखनीय होती. पोलिसांनी काही निदर्शकांना ताब्यात घेतले. मात्र उपोषण सुरू असेपर्यंत निदर्शनेही होत राहतील; असे केजरीवाल म्हणाले.
रविवारपासून स्वत: अण्णा उपोषणात सहभागी होणार आहेत.