
नवी दिल्ली: पक्षातील माझी भूमिका निश्चित झाली असून नवी जबाबदारी कधी स्वीकारायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील; असे राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
पक्षात मोठी जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. त्याबाबत पक्षात निर्णयही झाला आहे. मात्र ती जबाबदारी स्वीकारून मी त्यानुसार प्रत्यक्ष काम कधी सुरू करायचे याचा निर्णय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग हेच घेतील; असे राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राहुल गांधी यापुढे पक्षात मोठी भूमिका बजावणार असून त्याची ब्लू प्रिंट तयार आहे; असे पक्ष प्रवक्ते दिग्विजय सिंह यांनी नुकतेच सांगितले होते. त्यांच्याप्रमाणेच कायदेमंत्री सलमान खुर्शीद, परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्ण आणि खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी यांचा मंत्रिमंडळात सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
