शेअर बाजाराची पुन्हा उसळी

markethigh
मुंबई – बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सोमवारी सकाळीच निर्देशांकाने नवी उसळी घेतली आणि निर्देशांक २३ हजार ४०० वर जाऊन पोचला. लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ या निर्देशांकाला आहे. गुंतवणूकप्रेमी भारतीय जनता पार्टी सत्तेवर येईल असे अंदाज व्यक्त केले जात असल्यामुळे गुंतवणुकदारांना हुरूप आला आहे आणि त्यामुळे शेअर बाजार तेजीत आला आहे.

सोमवारी सायंकाळी साडेसहा नंतर एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर होणार आहेत. २००९ सालच्या निवडणुकीत हे निष्कर्ष चुकीचे ठरले होते. तरीही यावर्षी एक्झिट पोलची प्रतिक्षा सुरू आहे आणि त्या आधी व्यक्त झालेल्या अंदाजानुसार भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळेल असे मानले जात आहे. निवडणुकीचे निकाल प्रत्यक्षात १६ मे ला जाहीर होणार आहेत.

गेल्या शुक्रवारी शेअर बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित करीत २३ हजार ४८ एवढा निर्देशांक काढला होता. मात्र सोमवारी सकाळी त्यात १.८ टक्क्यांची वाढ झाली आणि निर्देशांक २३ हजार ४१० वर गेला.