इलस्ट्रीस – अंतराळ सफरीसाठीचे टाईम मशीन

time-machine
आपल्या मागच्या काळात आणि भविष्यात नक्की काय काय होते हे जाणून घेण्याची मानवाची इच्छा फार पुरातन आहे.टाईम मशीनच्या सहाय्याने भूतकाळाचा तसेच भविष्याचाही अनुभव घेता येईल असा संशोधकांना विश्वासही आहे. त्यासाठी अनेक प्रयोग, संशोधने संशोधक करत आहेत.खगोल शास्त्रज्ञांनीही याच धर्तीवर इलस्ट्रीस नावाचे आभासी ब्रह्मांड तयार केले असून या ब्रहमांडाची सफर आता करता येणार आहे.

इलस्ट्रीसचा प्रयोग म्हणजे १३ अब्ज वर्षांची ब्रह्मांडाच्या विकासाची कहाणी आहे. हा सुपर कॉम्प्युटरवर बनविलेला एक प्रोग्रॅम असून त्याच्या सहाय्याने माणूस प्रत्यक्ष अंतराळ सफरीचा आनंद घेऊ शकतो. आपल्या मनाप्रमाणे मागच्या काळात अथवा भविष्यात डोकावू शकतो. थ्रीडी तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला गेला आहे.यामुळे माणूस प्रत्यक्ष त्या त्या कालखंडात वावरत असल्याचा फिल घेऊ शकतो. सर्व आकाशगागांची यात्रा करू शकतो.

या प्रोग्रॅमसाठी ८००० सीपीयू एकत्र काम करतात. एकाच सीपीयूच्या सहाय्याने ही यात्रा अनुभव घेण्यासाठी २००० वर्षे लागतील असे संशोधकांचे म्हणणे आहे.बिग बँग नंतर १८ कोटी वर्षांनंतर हा प्रवास सुरू होतो तो आत्ताच्या वेळेपर्यंत पोहोचतो. टाईम मशीन प्रमाणे संगणकाच्या माध्यमातून ही यात्रा इच्छुक करू शकतात असेही समजते.

Leave a Comment