हल्दीरामची उत्पादने सौर ऊर्जेच्या मदतीने बनणार

haldiram
देशातील टेस्टी फूड उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेले हल्दीराम सौर उर्जेच्या सहाय्याने फूड प्रॉडक्टस तयार करणार आहेत. पारंपारीक उर्जेवरील अवलंबित्व कमी व्हावे, प्रदूषण टळावे आणि कार्बन उर्त्सजन कमी व्हावे यासाठी हा अपारंपारिक उर्जा वापराचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे अध्यक्ष शिवकिशन अग्रवाल यांनी सांगितले.

हल्दीरामने त्यांच्या कारखाना परिसरात सोलर फोटोव्होल्टीक पॉवर प्लांट उभा केला असून त्यातून १.५ मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. पहिल्याच दिवशी त्यातून ९२०० युनिट वीज मिर्मिती झाली. हल्दीराम पूर्णपणे ग्रीन पॉवरचा वापर करण्यावर भर देत असून विदर्भातही असा प्रकल्प उभारला गेला आहे. ही वीज थेट कारखान्यात वापरली जाते. विदर्भात कोळसा वीज निर्मितीचे प्रमाण अधिक असून त्यामुळे प्रदूषण समस्याही गंभीर आहे. यामुळे आम्ही प्रदूषणास आळा घालणारी सौर उर्जा वापरास प्राधान्य देत आहोत असेही अग्रवाला म्हणाले.

Leave a Comment