किंग्ज इलेव्हन पंजाबचा पाचवा विजय

punjab
अबुधाबी : यावर्षीच्या आयपीएल सामन्याात आतापर्यंत सलग पाचवा विजय मिळवत किंग्ज इलेव्हन पंजाबने दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. रॉयल चॅलेंर्जस बेंगलोर विरूध्दच्या सामन्यात पंजाबने संदीप शर्माच्या अचूक मा-या नंतर वीरेंद्र सेहवागच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर ५ गडी व ७ चेंडू राखून पराभव केला. या विजयाने पंजाबचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम रहिले आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंर्जस बँगलोर संघाला केवळ ८ बाद १२४ धावा करता आल्याा. सलामीवीरने केलेल्याल निराशाजनक सुरुवातीनंतर युवराजसिंगच्या (३५ धावा, ३२ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंर्जस बँगलोर संघाने सन्मानजनक धावसंख्या उभी करता आली. बेंगळुरूच्या डावात गेल (२0 धावा, २ चौकार, २ षटकार), डिव्हिलियर्स (१७) व मोर्केल (१५) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. पंजाबतर्फे संदीप शर्माने अचूक मारा करताना ३ षटकांत १५ धावांच्या मोबदल्यात विराट कोहली, ख्रिस गेल व पार्थिव पटेल यांना माघारी परतवले. मिशेल जॉन्सन व ऋषी धवन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

पंजाब संघाने विजयासाठी आवश्यक धावा १८.५ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चेतेश्वर पुजारा (१0), वृद्धिमान साहा (0२) आणि ग्लेन मॅक्सवेल (0६) झटपट माघारी परतल्यामुळे पंजाब संघाची ३ बाद ४० अशी अवस्था झाली होती. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग (३२ धावा, २६ चेंडू, ४ चौकार) आणि डेव्हिड मिलर (२६ धावा, २0 चेंडू, ४ चौकार) यांनी चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करीत डाव सावरला.

सेहवाग व मिलर तंबूत परतल्यानंतर कर्णधार जॉर्ज बेली (१६ धावा, १६ चेंडू, १ चौकार) आणि ऋषी धवन (२३ धावा, २२ चेंडू, ३ चौकार) यांनी सहाव्या विकेटसाठी ३९ धावांची अभेद्य भागीदारी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. हा पंजाब संघाचा सलग पाचवा विजय आहे.