मुंबई इंडियन्सपुढे विजयाचे आव्हान

mi
अबुधाबी- आयपीएलच्याा सातव्याल हंगामात मुंबई इंडियन्ससला एकही विजय मिळविता आला नाही. सुरावातीच्या- चार सामन्यात पराभव पत्करावा लागल्यााने त्यांना आता आगमी काळात होत असलेल्या सर्वच सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्याामुळे आता आखातीत टप्प्याचा शेवट विजयाने करण्याची संधी मुंबई इंडियन्स संघाला सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीने मिळणार आहे.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील चारही लढती मुंबई इंडियन्स संघाने गमावल्या आहेत. लसिथ मलिंगा, कीरेन पोलार्ड, माइक हसी अशा दिग्गजांचा समावेश असूनही मुंबई इंडियन्सना विजयाने हुलकावणी दिली आहे. रोहित शर्मा, माइक हसी, आदित्य तरे, अंबाती रायुडू चौघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे.

दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादला सर्वागीण सुधारणा आवश्यक आहे. आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर जोडीला अन्य फलंदाजांनी साथ देणे आवश्यक आहे. डेल स्टेन, भुवनेश्वक कुमार, अमित मिश्रा या त्रिकुटावर गोलंदाजाची भिस्त आहे. डॅरेन सॅमीला सूर गवसणे हैदराबादसाठी गरजेचे आहे. त्या्मुळे या सामन्याीत कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment