कोलकत्ता, राजस्थान विजयासाठी झुंजणार

kkr
अबुधाबी- यावर्षीच्या आयपीएल सामन्यात बलाढय संघाची कामगिरी आतापर्यंत निराशजनक झाली आहे. या संघाला अजून म्हणावा तसा सूर गवसला नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळत असताना बलाढय़ संघही ढेपाळताना दिसत आहे. मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्हीस संघ आमनेसामने येत आहेत. आतापर्यंत चार सामन्यांपैकी या दोन्ही संघांना दोन विजय मिळवता आले आहेत.

कोलकाताला अजूनही फलंदाजीमध्ये लय सापडलेली नाही. कर्णधार गौतम गंभीर, युसूफ पठाण यांना अद्यापही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजी हे त्यांचे प्रमुख अस्त्र असून सुनील नरीन आणि मॉर्ने मॉर्केलसारखे नावाजलेले गोलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय कोणाचा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या सामन्यात राजस्थानने बंगळुरूसारख्या दिग्गज संघाची हवा काढून टाकली होती. त्या मुळेच राजस्थानच्या गोलंदाजीचा मारा भेदक होत असला तरी त्यांना फलंदाजीमध्ये आतापर्यंत सातत्य राखता आलेले नाही. राजस्थान रॉयलची मुख्यत्वकरून भिस्त अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन यांच्यावर असणार आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Leave a Comment