मोटोरोलचा स्वस्त स्मार्टफोन भारतात येणार

motoe2
मोटोरोलाने त्यांचा नवीन स्वस्त स्मार्टफोन युकेबरोबरच भारतातही लाँच करण्याचा निर्णय जाहीर केला असून येत्या १३ मे रोजी तो सादर केला जात आहे. लंडनबरोबरच भारतातील इव्हेंटसाठीची निमंत्रणे कंपनीने दिली आहेत. मेड टू लास्ट प्राइज्ड फॉर ऑल अशा हेडलाईनने ही निमंत्रणे दिली गेली आहेत.

याचाच अर्थ असा की हा नवा फोन मोटो जी पेक्षा स्वस्त असणार आहे. सध्या भारतात मोटो जी ८ जीबीसाठी १२४९९ तर १६ जीबीसाठी १३९९९ रूपयांत विकला जात आहे. नवा फोन मोटो ई नावाने आणला जाईल असे सांगितले जात आहे. यात ४.३ इंचाचा स्क्रीन, ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, अँड्राईड किटकॅट अशा सुविधा आहेत आणि तो फक्त ६.२ मिलीमीटर जाडीचा आहे असे समजते.