
नवी दिल्ली – ठाण्यातल्या अमर शर्मा या युवा खगोल शास्त्रज्ञाचे नावं अंतराळातल्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. अमेरिकेतले खगोल अभ्यासक डेव्हिड एच. लेव्ही यांनी मंगळ आणि गुरु यांच्या मार्गातल्या लघुग्रहाला ‘शर्मा 380607’ असे नाव दिले आहे. लेवी यांनीच 2004 साली या उपग्रहाचा शोध लावला आहे .मुळचा ठाणेकर असलेला अमरचे सुरुवातीचे शिक्षण ठाण्यातल्या सिंघानिया विद्यालयात आणि नंतर बंगळुरुला झाले.
ठाण्याच्या तरुणाचे नाव लघुग्रहावर!
खगोल शास्त्रातल्या अभ्यासात त्याने आपले आयुष्य वाहून घेतले आहे. खगोल अभ्यासादरम्यान तो डेव्हिड यांच्याशी ऑनलाइन चर्चा करत असे. त्याची या विषयातली गोडी लक्षात घेऊनचं डेव्हिड यांनी लघुग्रहाला अमरचं नाव दिले आहे. `इंटरनॅशनल अस्ट्रॉनॉमिकल युनियन`ने गेल्याच आठवड्यात या नामकरणास मान्यता दिली आहे. ‘तब्बल सहा लाख लघु ग्रहांमध्ये माझ्या नावाचा एक लघुग्रह अंतराळ फिरतो ही निश्चित आनदाची बाब’ असल्याचे आनंदने म्हटले आहे.
