होंडा मोटर्स ३१२२६ गाड्या परत घेणार

honda
होंडा मोटर्सच्या भारतीय युनिटने ३१२२६ गाड्या परत घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून ब्रेक सिस्टीममधील संभावित दोष दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी ब्रायो हचबॅक आणि अमेझ मॉडेल्सच्या गाड्या परत बोलावणार आहे.

कंपनीतील अधिकार्‍यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २८ फेब्रुवारी २०१३ ते १६ जानेवारी २०१४ या काळात उत्पादित करण्यात आलेल्या या मॉडेल्सच्या गाड्यांच्या ब्रेक व्हॉल्व्हमध्ये कांही दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे ब्रायोच्या १५८२६ व अमेझच्या १५६०३ गाड्या परत घेतल्या जाणार आहेत. गरज असेल त्याप्रमाणे व्हॉल्व्ह बदली करून त्या परत दिल्या जाणार आहे. कंपनीकडे या गाड्यांच्या ब्रेकमध्ये दोष असल्याची अजून एकही तक्रार आलेली नाही असेही सांगितले जात आहे. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.