विजय मिळवूनही रमीझ राजाने पाकिस्तानी कर्णधाराला लगावला टोला, विचारला विचित्र प्रश्न, नोकरी आली धोक्यात


पाकिस्तानने तब्बल 4 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका जिंकली आहे. कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखाली संघाने रावळपिंडी कसोटीत इंग्लंडचा पराभव करून मालिका 2-1 अशी खिशात घातली. हा विजय पाकिस्तानसाठी मोठी उपलब्धी आहे, कारण गेली 4 वर्षे ते घरच्या कसोटी मालिकेत विजयासाठी आसुसले होते. सलग 6 कसोटी सामने आणि 2 मालिका गमावल्यानंतर कर्णधार शान मसूदनेही प्रथमच यश संपादन केले. या यशानंतरही पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू रमीझ राजाने टोमणे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने लाइव्ह टीव्हीवर शान मसूदला एक विचित्र प्रश्न विचारला. पीसीबीने त्याच्या प्रश्नाची दखल घेतली असून आता त्याची नोकरी धोक्यात आली आहे.

पाकिस्तानच्या विजयानंतर कॅप्टन शान मसूद मुलाखत देत होता. यादरम्यान, अँकरने त्याला सांगितले की, या विजयामुळे तुम्हाला एक कर्णधार म्हणून खूप दिलासा मिळेल, कारण याआधी तुम्हाला सलग 6 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. अँकरने हे बोलणे नुकतेच संपवले होते, तेव्हा रमीझ राजाने त्याला अडवले आणि शान मसूदची खरडपट्टी काढली. तो अभिमानाने म्हणाला, ‘तुम्ही सलग 6 पराभव कसे काय साधले?’ हे सांगताच तो हसायला लागला. मात्र, पाकिस्तानी कर्णधाराने अतिशय आरामात उत्तर दिले. त्याच्या या प्रश्नाची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टनुसार त्याच्यावर कारवाई होऊ शकते. पाकिस्तानच्या पुढील मालिकेत त्याला कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकले जाऊ शकते.
https://x.com/CallMeSheri1/status/1850092147636305937?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1850092147636305937%7Ctwgr%5E01a08f05e9b243e4aa03bcd1b49a71e3c9fd0d61%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Framiz-raja-taunts-shan-masood-on-live-tv-as-pakistan-win-test-series-against-england-after-4-years-pcb-took-notice-likely-to-remove-2911000.html
शान मसूदला नुकतेच कर्णधार बनवण्यात आले. कर्णधार झाल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली मालिका गमावली. यानंतर बांगलादेश संघाने पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला. या मालिकेत इंग्लंड संघाने मुलतान कसोटीत 800 हून अधिक धावा करून सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे त्यांच्या कर्णधारावर प्रश्न उपस्थित झाले आणि संपूर्ण संघाचाही अपमान झाला.

मात्र यानंतर त्याने बोर्डासह संघात काही बदल केले. त्यानंतर पुनरागमन करत मुलतान आणि रावळपिंडीमध्ये विजय मिळवत मालिका 2-1 अशी जिंकली. याआधी त्याने 2021 च्या सुरुवातीला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. म्हणजेच तब्बल 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत विजय मिळाला आहे.