
पॅरिस – सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशल-अल-असाद यांच्या सरकारकडून रासायनिक अस्त्रांचा वापर केला जात आहे. त्याची आमच्याकडे ‘माहिती’ आहे, परंतु त्याबद्दलचे ठोस पुरावे नाहीत, असा दावा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवॉँ ओलांद यांनी केला आहे. आमच्याकडे काही माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार असाद यांनी अलीकडेच रासायनिक अस्त्राचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे. रेडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओलांद यांनी हा दावा केला आहे, परंतु त्याचे स्पष्टीकरण त्यांनी देण्याचे टाळले. या अगोदर फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन फॅबियस यांनीदेखील रेडिओला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला होता.
