रैनामुळे चेन्नई सुपर किंग्ज विजयी

अबूधाबी- गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नसलेल्या चेन्नई सुपर किंगजचा स्टागर फलंदाज सुरैश रैना याला सुर गवसला आहे. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या् सामन्यात तुफानी फलंदाजी केली. त्याने ४१ चेंडूंत ५६ धावांची खेळी साकारताना ५ चौकार आणि एक षटकार खेचला. त्याच्या या दमदार फलंदाजीच्या जोरावरच चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सला ९३ धावांनी पराभूत केले.

चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यामत प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर अपयशी ठरल्याेनंतर दमदार फलंदाजी करणारा सुरेश रैना अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर तुफानी फलंदाजी केली. त्याच्या धुवाँदार अर्धशतकामुळेच चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्याा सामन्याात ९३ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या साहाय्याने ३२ धावा काढल्या. फॅफ डय़ू प्लेसिनने १७ चेंडूंत उपयुक्त २४ धावा काढल्या. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या जयदेव उनाडकटने ३२ धावांत ३ बळी घेतले.

चेन्नईचे १७७ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या दिल्लीचा डाव १५.४ षटकांत फक्त ८४ धावांत आटोपला. दिल्लीकडून जिम्मी निशामने २२ आणि दिनेश कार्तिकने २१ धावा काढल्या. त्या वगळता दिल्लीच्या अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. ऑफ-स्पिनर आर. अश्विनने फक्त ३ धावांत २ बळी घेतले, तर रवींद्र जडेजा आणि इश्वर पांडे यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या सातव्या मोसमातील आपले खाते उघडले आले आहे.

Leave a Comment