चहा कडाडला

नागपूर  – यंदा चहाच्या किमती दिवसेंदिवस चहाची वाढती मागणी व पावसामुळे पीक खराब झाल्याने कडाडल्या आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. चहा महागल्यानंतरही ब्रँडेड चहाची बाजारपेठ वाढली आहे.दरवाढीमुळे कट चहा महागण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी झाल्याने सर्वसाधारण १६0 रुपये मिळणारा चहा प्रति किलो १८0 ते २00 रुपयांवर गेला आहे. याशिवाय उच्च प्रतीचा चहा ३२५ ते ४५0 रुपये आहे.

भाववाढीमुळे गेल्या काही दिवसांत व्यवसायात घट झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. ही घट काही दिवसांसाठी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्याबाबत सजग असलेल्यांनी ‘ग्रीन टी’चा अवलंब केल्याचा फटका खर्‍या चहा व्यवसायावर पडला. गेल्या तीन वर्षांत चहाच्या किमतीत दुप्पट वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चहाची मागणी कमी असतानाही भाववाढ झाल्याने चहा विक्रेते आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.


निर्यातीत वाढ वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या याचकाळात ८0.१८ कोटी डॉलर चहाची निर्यात करण्यात आली होती. वस्तुत: पाकिस्तान, इराण आणि रशियासारख्या देशातून चहाची मागणी हळूहळू वाढत आहे. चहासाठी ब्रिटन, इराक व यूएई या भारताच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. फेब्रुवारीमध्ये चहाची निर्यात १२.३६ टक्क्यांनी वाढून ६.४९ कोटी डॉलरवर पोहोचली. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ५.७७ कोटी डॉलर चहाची निर्यात करण्यात आली होती. पाकिस्तानातून भारतीय चहाची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २0१३ दरम्यान पाकिस्तानने भारताकडून २.५ कोटी किलोग्रॅम चहाची आयात केली. २0१३ मध्ये हा आकडा २ कोटी किलोग्रॅम एवढा होता.

Leave a Comment