अॅपल ने त्यांच्या वापरल्या गेलेल्या सर्व उत्पादनांचे रिसायकलिंग करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे त्याचबरोबर त्यांची सर्व स्टोअर्स, कार्यालये आणि डेटा सेंटर अपारंपारिक उर्जेवरच चालविली जाणार असल्याचेही सांगितले आहे. उपकरणे व ऑनलाईन सर्व्हीसेस मुळे होत असलेले प्रदूषण कमी करण्यासाठी हा निर्णय अॅपलने घेतला आहे. अॅपल ला ग्रीनर अॅपल इंक बनविण्याचे उदिष्ट ठेवले असल्याचे कंपनीचे सीइओ टीम कुक यांनी जाहीर केले आहे.
कंपनीने त्यांच्या कॅलिफोनिर्यातील क्युपरटिनो कार्यालयात अपारंपारिक उर्जेचा वापर वाढविला आहे. तसेच जगभरातील ४२० स्टोअर्समधून गिफट कार्ड देण्याची व्यवस्था केली आहे. यानुसार पुन्हा विकले जाऊ शकतील असे आयफोन, आयपॉड,आयपॅड युजर एक्स्चेंज करू शकणार आहेत. रिसायकलींग साठी कोणताही चार्ज कंपनी आकारणार नाही.
टाकावू उत्पादने जमिनीत पुरली जातात मात्र त्यात असलेल्या टॉक्सीक्समुळे प्रदूषण वाढत जाते. ते कमी करण्यासाठी अॅपलने हे पाऊल उचलले असून अपारंपारिक उर्जेत सौर, पवन, जल उर्जेचा वापर कंपनी करणार आहे. अॅपलच्या चार डेटा सेंटरमध्ये तसेच १२० स्टोअर्समध्ये अपारंपारिक उर्जेचा वापर सुरूही झाला असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.