यंग इंडिया ङ्गिट इंडिया

भारत हा जगातला सर्वात तरुण देश आहे, असे आपल्याला वारंवार सांगितले जात आहे. ही गोष्ट खरीही आहे. भारताच्या लोकसंख्येतील ५५ टक्के एवढा हिस्सा ० ते २५ या वयोगटातील मुलांचा आहे. जगाच्या पाठीवर तरुणांचे लोकसंख्येत एवढे प्रमाण असलेला दुसरा कोणताही देश नाही आणि देशाच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. असे असले तरी ही केवळ संख्यात्मक जमेची बाजू आहे. आपल्या देशातले हे तरुण कितपत सक्षमआणि शारीरिकदृष्ट्या समर्थ आहेत याचा शोध घ्यायला गेलो तर  ङ्गार निराशा पदरी पडते. कारण आपल्या देशातल्या तरुण-तरुणींमध्ये  शारीरिक क्षमतेचा ङ्गार अभाव आहे. या तरुण पिढीला कष्टाच्या कामाची सवय नाही. व्यायामाची आवड नाही आणि खेळामध्ये रूची नाही. ही तरुणपिढी आपला दिवसातला मोठा वेळ संगणक, टी.व्ही. किंवा अन्य बैठ्या करमणुकीच्या साधनांपुढे खर्च करते. शारीरिक हालचालींचा अभाव असल्यामुळे त्यांच्यात लठ्ठपणा वाढत आहे. 

दुसर्‍या बाजूला खायला न मिळणारी मुले आहेत, जी अतिशय अशक्त आहेत. अशी दोन्हीही टोकाची परिस्थिती असल्यामुळे तरुण पिढीच्या आधारावर आपल्याला देशाच्या भवितव्याची कसलीच योजना आखता येत नाही. ही गोष्ट आता सरकारच्या लक्षात यायला लागलेली आहे. म्हणून केंद्र सरकारने एक नवी योजना हाती घेतली असून तिच्यामध्ये प्रत्येक तरुणाला दिवसभरामध्ये किमान एक तास व्यायाम किंवा खेळ यासाठी देण्याची सक्ती करण्यात येणार आहे. केंद्रीय युवा कल्याण खात्याने यासाठी ङ्गिट इंडिया ही मोहीम आखली आहे. त्यामध्ये प्रत्येक तरुणाला दिवसभरात शारीरिक तंदुरुस्तीसाठी किमान एक खेळ खेळावा लागेल आणि योगासने, दंड बैठका असा कोणता तरी एक व्यायाम करावा लागेल. तरच ते शारीरिकदृष्ट्या सक्षम होतील. चीन मधील मजूर ङ्गार कार्यक्षम असतात असा सर्वांचा अनुभव आहे. मात्र त्यामागचे कारण अशा प्रकारची योजना हेच आहे. 

१९९२ सालपासून चीनमध्ये प्रत्येकाला किमान एक तास आपल्या शरीराच्या रक्षणासाठी देण्याची सक्ती करणारा कायदा अमलात आलेला आहे. तिथल्या केंद्र सरकारच्या सात विविध खात्यांच्या समन्वयातून ही योजना राबवली जात आहे. चीनचे अनुकरण करून केरळमध्ये सुद्धा अशीच एक योजना राबविण्यात आलेली आहे. भारत सरकारच्या ङ्गिट इंडिया मोहिमेसाठी केरळमधील कार्यक्रमाचे निरीक्षण केले जात आहे. केंद्र सरकारची ही योजना त्याच धर्तीवर तयार केली जाईल. मुलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती नसेल तर त्यांचा अभ्यास सुद्धा चांगला होत नाही. त्यामुळे चीनमध्ये अशा प्रकारच्या योजनेनंतर मुलांच्या अभ्यासात सुद्धा प्रगती झालेली दिसून आली आहे. अशा योजनेतून मुलांच्या औषधोपचारावर होणारा खर्च सुद्धा टळत असतो. शेवटी देशाची भावी पिढी खंबीर असेल तरच देश मोठा होणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment